Marathyanchya Rajykatha by Govind Sakharam Sardesai
इतिहास चित्ताकर्षक व स्फूर्तिदायक करावा अशी पुष्कळांची सूचना असून माझ्याही मनात हा विचार आज कैक वर्षे घोळत आहे. सवडीनुसार मराठ्यांच्या इतिहासातील कित्येक प्रसंग निवडून मी त्यांची कथानके लिहून काढिली; आणि प्रकाशक यांनी वारंवार कळकळ व्यक्त केली म्हणूनच एकवीस गोष्टीचा हा संच तयार होऊन वाचकांपुढे ठेवण्याची मला संधी मिळाली. लघुकथा, कादंबरी इत्यादीचे अलीकडे एक तंत्र बनले आहे ते मला अवगत नाही. मी आपल्या मनाने संवाद, भाषणे, स्वगत विचार, जिथे जसे योग्य वाटले तसे दाखल करून एकवीस गोष्टीत दोनशे वर्षांचा संकलित इतिहास सांगितला आहे. त्यातही कित्येक अपरिचित प्रसंग मी मुद्दाम निवडले आहेत.
Categories: Literary Fiction







